जि. प.च्या निधीतून मरनेली गावाचा मुख्य रस्ता बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:25+5:302021-03-09T04:39:25+5:30

अहेरी : तालुक्याच्या मरनेली गावात अनेक अडचणी आहेत. त्यातून प्रमुख अडचण रस्त्याची असून ये - जा करण्यास त्रास सहन ...

Dist. The main road of Marneli village will be constructed with the funds of W. | जि. प.च्या निधीतून मरनेली गावाचा मुख्य रस्ता बांधणार

जि. प.च्या निधीतून मरनेली गावाचा मुख्य रस्ता बांधणार

Next

अहेरी : तालुक्याच्या मरनेली गावात अनेक अडचणी आहेत. त्यातून प्रमुख अडचण रस्त्याची असून ये - जा करण्यास त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेमधून निधी उपलब्ध करून देऊन येत्या काही दिवसांत सदर रस्ता काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले. राजारामपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मरनेली येथे ग्रामीण व्हाॅलिबाल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.

सदर क्रीडा स्पर्धेसाठी पहिला, दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

यावेळी सहउद्घाटक म्हणून आजयभाऊ नैताम, तर अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सुरेखा आलाम, माजी उपसरपंच अशोक येलमुले, खाँदलाचे माजी सरपंच शंकुतला कुळमेथे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुधाकर आत्राम, पेसा अध्यक्ष सुरेश पेंदाम, वंदना अलोने, बिचू मडावी, धर्मा पेंदाम, सुरेश पेंदाम, श्रीनिवास राऊत, पांडु गावडे, मधुकर झोडे, इस्पात गावडे, हिरामण कोणम, भगवान मडावी, धाडू निमगडे, खांदलाचे उपसरपंच गुरुदास पेंदाम, रावजी अलीने, नारायण झाडे, लक्ष्मण झाडे, गजानन झाडे, पोरिया आत्राम, पिरू झोडे, चीना तलांडे, किसन दुर्गे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी पचायत समिती सभापती तलांडे यांनीसुध्दा अनेक समस्यांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान मडावी यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण डोंगरे यांनी केले. पांडू गावडे यांनी आभार मानले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण डोंगरे, पांडू गावडे, सीमोना आत्राम, सोडवली कोणम, मधुकर झोडे, ईश्वर तलांडे, रमेश आत्राम, प्रकाश झाडे, महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.

Web Title: Dist. The main road of Marneli village will be constructed with the funds of W.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.