जि. प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:14+5:302021-08-19T04:40:14+5:30

भामरागड : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट राेजी बुधवारी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीची ...

Dist. W. The President reviewed the development work | जि. प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

जि. प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

Next

भामरागड : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट राेजी बुधवारी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. दरम्यान, विविध विकासकामे व याेजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना कंकडालवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तर देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच गाेंधळ उडाला.

या आढावा सभेत पंचायत समिती अंतर्गत पंचायत विभाग, बांधकाम विभाग, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद गडचिरोली विभाग अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, सिंचाई, आरोग्य, एकात्मिक बाल विकास, शिक्षण, आदी विभागांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भामरागड तालुक्याला जिल्हा परिषदेकडून शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर विकासात्मक कामे करण्यास निधी उपलब्ध करून देऊ, अशी माहिती यावेळी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.

यावेळी प्रभारी बीडीओ चव्हाण, आविसचे तालुकाध्यक्ष सुधाकर तिम्मा, सीताराम मडावी, शामराव येरकलवार, लालसू आत्राम, चात्रू मडावी, जगदीश कोकंमोठीवार, रामचंद्र दुर्गे, गणेश गोटा, लक्ष्मीकांत बोगामी, श्रीकांत बंडमवार, नीलेश वेलादी, जुलेख शेख, कार्तिक तोगम व तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, बाल विकास प्रकल्प अधिकारी चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डाॅ. चौधरी, जमदाडे, बांधकाम विभागाचे अभियंता जुवारे, कनिष्ठ अभियंता डाकुर, कृषी अधिकारी श्रीरामे, पंचायत विस्तार अधिकारी देव्हारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते.

बाॅक्स .......

आविस कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा

सभा आटाेपल्यानंतर भामरागड येथील शासकीय विश्रामगृहात आविसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. आगामी भामरागड नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात सुद्धा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. भामरागड तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावरून निधी कमी पडून देणार नाही. तालुक्यातील आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठतेत काम करून पक्ष बळकटीसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी केले.

Web Title: Dist. W. The President reviewed the development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.