जि. प. अध्यक्षांची अंकिसाला आकस्मिक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:36+5:302021-06-01T04:27:36+5:30
अंकिसा परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या साेडविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु लाेकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने त्या ...
अंकिसा परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या साेडविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु लाेकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने त्या सुटण्यास अडचणी येत आहेत. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी कोपेला, कोर्ला व रमेशगुडम गावांना भेट दिली असता अंकिसातील सामाजिक कार्यकर्ते व आविसं कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना अंकिसा येथे भेट देण्याची विनंती केली. त्यानुसार अजय कंकडालवार यांनी प्राथमिक आराेग्य केंद्रात आकस्मिक भेट दिली. याप्रसंगी नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदनात, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा येथे कृषी गोदामाचे बांधकाम करावे, रबी हंगामातील धानाची खरेदी लवकर करावी. अनेकजण खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असल्याने माेठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र लवकर सुरू करावे आदी मागण्यांचा समावेश हाेता.
बाॅक्स
पीएचसीची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची
अंकिसा येथे प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे बांधकाम किती दिवस टिकणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे याबाबतची चाैकशी सुरू करावी, अशी मागणी सूरज दुदीवार, मोहनराव मेचिनेनी, सत्यनारायण बेल्लमकोंडा, जयराम पांडवला, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शानगोंडा, वेंकटेश्वर शानगोंडा, सूरज दुदीवार, रमेश गोसकोंडा, समया पांडवला, महेंद्र कंदकुरी, अमर उपारपू उपस्थित होते.
===Photopath===
310521\31gad_1_31052021_30.jpg
===Caption===
जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देताना नागरिक.