साडेतीन हजार दाखले वाटप

By admin | Published: August 6, 2014 11:50 PM2014-08-06T23:50:39+5:302014-08-06T23:50:39+5:30

सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर चालू वर्षात ३ हजार ५८० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Distribute three and a half thousand certificates | साडेतीन हजार दाखले वाटप

साडेतीन हजार दाखले वाटप

Next

योजना : सिरोंचा तालुक्यात महसूल विभागाची कामगिरी
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर चालू वर्षात ३ हजार ५८० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सन २०१३-१४ या महसूल वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करून जातीचे ८४५, उत्पन्नाचे १ हजार ५, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे ४९८, नॉनक्रिमिलीअर ३२६, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ८७, शिधापत्रिका ७६९ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५० जणांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत दाखल्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचा पंचायत समितीचे उपसभापती अब्दुल रहिम गफ्फार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी १० जातीचे दाखले, नॉनक्रिमिलीअर २, अधिवास प्रमाणपत्र ८, उत्पन्नाचे दाखले १०, शिधापत्रिका २२, सातबारा २५, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ५ आदी दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, तलाठी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, कोतवाल यांना मागील वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्ती प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
महसूल विभागामार्फत सिरोंचा तालुक्यात मंडळ कार्यालय, तलाठी कार्यालयाच्यावतीने मागील वर्षी समाधान शिबिराच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागाच्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वंचित राहू नये म्हणून विशेष कार्य केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Distribute three and a half thousand certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.