९७ शेतकऱ्यांना तूर बियाणे, ७० जणांना भाजीपाला बियाणांची किट वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:42 AM2021-07-14T04:42:17+5:302021-07-14T04:42:17+5:30
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना एकूण ५०० विविध फळांची रोपे तसेच ९७ शेतकऱ्यांना प्रत्येकी एक किलो तुरीचे बियाणे, तर ७० शेतकऱ्यांना ...
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना एकूण ५०० विविध फळांची रोपे तसेच ९७ शेतकऱ्यांना प्रत्येकी एक किलो तुरीचे बियाणे, तर ७० शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणांची किट प्रत्येकी एक किलो, ८ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलो रांजी बियाणे वाटप करण्यात आले. तसेच २० शेतकऱ्यांना छत्री, ४० सुशिक्षित शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शक पुस्तिका वितरित करण्यात आल्या.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काेरचीचे कृषी विस्तार अधिकारी आर. व्ही. पंधरे हाेते. उद्घाटक म्हणून कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष टेकाम उपस्थित हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून कोरची पंचायत समितीचे सभापती श्रावणकुमार मातलाम, कृषी सहायक राउटे, धीरज ढवळे, ग्रामसेवक घुटके, मारगाये, माजी सरपंच राजेंद्र नैताम, सामाजिक कार्यकर्त्या दूधकवर, ग्रामपंचायत सदस्य टेंभुर्णी, माजी सरपंच सामबाई पुडो, कृषिमित्र रोमन नैताम, ओमप्रकाश कार्यपाल आदी हजर हाेते.
या कृषी मेळाव्यात पोलीस मदत केंद्र कोटगुलच्यावतीने परिसरातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, वृक्ष रोपे, छत्री आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना शेतीविषयक व धान लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी बांधवांच्या मनोरंजनासाठी पोलीस मदत केंद्र कोटगुल, राज्य राखीव पोलीस गट धुळे व शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. परिसरातील पाचशे ते साडेपाचशे स्त्री व पुरुष, शेतकरी बांधव उपस्थित होते.