कृषी मेळाव्यात बियाण्यांसह प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:25 AM2021-07-15T04:25:53+5:302021-07-15T04:25:53+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी अधिकारी संजय रामटेके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वासुदेव दिघोडे होते. प्रमुख अतिथी ...
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी अधिकारी संजय रामटेके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वासुदेव दिघोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण टेंभुर्णे, कृषी सहायक सुनील धुडसे, भटेगावचे सरपंच मोहन पुराम, पुराडाचे उपसरपंच रामचंद्र रोकडे, पोलीस पाटील मंजुषा पुराम, रेखा पुराम, शोभा कुमरे, रूखमा कुमरे, पुराडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक शेळके उपस्थित होते. मेळाव्यात ६० शेतकऱ्यांना फळझाडे ४० शेतकऱ्यांना भेंडी व चवळी बिजाई, ३० शेतकऱ्यांना घमेले तर ५० शेतकऱ्यांना कारले, वांगी, दोडके आदी वाणांचे बियाणे वितरित करण्यात आले.
यावेळी ३८ नागरिकांना प्री एज्युकेशन कीट व परिसरातील कुपोषित १ हजार २०० बालकांकरिता दूध पावडर उपलब्ध करून देण्यात आला. या पावडर संबंधित अंगणवाडी सेविकांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. याप्रसंगी पाेलीस दादालोरा खिडकी योजनेतून १५ नागरिकांना जात प्रमाणपत्र, ११३ नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड, ४ जणांना पॅन कार्ड, १२ जणांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ४ नागरिकांना अधिवास प्रमाणपत्र तर एका नागरिकाला नाॅन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने पोस्टर व पत्रकाच्या माध्यमातून नक्षलविरोधी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, संचालन पोलीस हवालदार गौतम दुर्गे तर आभार यशवंत जुमनाके यांनी मानले.
140721\img-20210712-wa0043.jpg
कृषी मेळाव्यात मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोडे