महिला पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 01:29 AM2017-06-18T01:29:03+5:302017-06-18T01:29:03+5:30
महिला राजसत्ता आंदोलन व सावित्री अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि. प. कनिष्ठ महाविद्यालय
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महिला राजसत्ता आंदोलन व सावित्री अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि. प. कनिष्ठ महाविद्यालय व ग्राम पंचायत वडधा, आरमोरी येथे पंचायत राज बॉस कोर्स परीक्षा घेऊन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
अर्थव्यवस्थापन, शासकीय अध्यादेश योजना, गाव विकास यंत्रणा, पंचायत राज व्यवस्था आदीचे प्रशिक्षण देऊन सहभागींची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. परीक्षेला कोटगल, वसा, साखरा, माडेतुकूम, गडचिरोली, चांभार्डा, वायगाव, येरकड, मुंजालगोंदी, देलोडा, खरपी, बोरी आदी गावातील महिला सहभागी झाल्या. यावेळी बीडीओ सज्जनपवार, रायपुरे, हुड, मनीषा दोनाडकर, सुरेखा बारसागडे उपस्थित होत्या. ज्योती मेश्राम, गुरूदास सेमस्कर, अर्चना जनगनवार, शिवणकर, मनीषा मडावी यांनी सहकार्य केले.