नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:00 AM2018-09-16T01:00:01+5:302018-09-16T01:00:39+5:30

पोलीस विभागाच्या वतीने मेडपल्ली येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. गावातील महिलांना कपडे, लहान मुलांना चप्पल वितरित करण्यात आले.

Distribution of essential commodities to citizens | नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next
ठळक मुद्देमेडपल्ली येथे जनजागरण मेळावा : बिरसा मुंडा कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : पोलीस विभागाच्या वतीने मेडपल्ली येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. गावातील महिलांना कपडे, लहान मुलांना चप्पल वितरित करण्यात आले. बिरसा मुंडा कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण करून खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
अहेरीचे अपर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी, संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिमलगट्टा उप पोलीस ठाण्यांतर्गत मेडपल्ली येथे शनिवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात सर्वसामान्य व आदिवासी जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आदिवासी नागरिकांनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या मेळाव्यात आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरविण्यात आला. बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती देण्यात आली. गावातील महिलांना साड्यांचे तर लहान मुलांना चप्पल, वाटप करण्यात आले. तसेच पोलीस विभागातर्फे यापूर्वी उपपोलीस ठाणे स्तरावर बिरसा मुंडा कबड्डी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच भगवान आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य सेवक गिलबिले, ज्योती येलाम उपस्थित होत्या. मेळाव्याला जिमलगट्टा परिसरातील ३०० ते ४०० नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या प्रसंगी सूरज निंबाळकर, स्वप्नील शेळके यांच्यासह उपपोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. सदर मेळाव्याच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी ग्रामस्थांशी विविध बाबींवर संवाद साधला. अडीअडचणी समजून घेतल्या.

Web Title: Distribution of essential commodities to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.