पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:57 AM2017-10-24T11:57:11+5:302017-10-24T12:00:48+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या पोमके ताडगाव येथे सोमवारी पोलिस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भामरागड- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या पोमके ताडगाव येथे सोमवारी पोलिस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नक्षलग्रस्त भागात केंद्रीय पोलिस राखीव दलासह अन्य निमलष्करी दले व राज्य राखीव पोलीस दल आणि पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने असे जनजागरण मेळावे घेण्यात येत असतात. या मेळाव्यास अलीकडच्या काळात जवळपासच्या लहानसहान पाड्यांवरील आदिवासी स्त्रीपुरुष व मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागले आहेत. या मेळाव्यात या आदिवासींना आत्मसमर्पणाच्या योजनांसह, कन्यादान, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते. या प्रसंगी त्यांना रोजच्या वापरातील घरगुती सामानासह कपडे, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येते. या कार्यक्रमात अनेक प्रकारचे खेळ व स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या मेळाव्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद हा जनसामान्यांत जागरुकता येत असल्याचे निदर्शक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या मेळाव्यास ३५० स्त्रिया व ३०० पुरुषांनी आपली हजेरी लावली होती.