शेतकऱ्यांना खत, धान बियाणे व रेनकाेटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:31+5:302021-07-08T04:24:31+5:30
याप्रसंगी पं. स. कृषी अधिकारी एन. एस. नगराळे, कृषी विस्तार अधिकारी बी. डी. मोरकुटे, वनपाल एस. ...
याप्रसंगी पं. स. कृषी अधिकारी एन. एस. नगराळे, कृषी विस्तार अधिकारी बी. डी. मोरकुटे, वनपाल एस. पी. गुड्डाम, पशुवैद्यकीय अधिकारी सागर डुकरे, तलाठी साईनाथ कुळयेठी, ग्रामसेवक प्रकाश सलामे, आरोग्य केंद्र रेगडीचे वैदयकीय अधिकारी डॉ. उमाकांत मेश्राम, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा तसेच तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कृषी सेवक, कृषी मित्र तसेच दीडशे शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी व आरोग्य संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना २५ बॅग युरिया खत, १० बॅग धानाचे बियाणे, ४५ पॅकेट वाल शेंगा बियाणे, २५ पॅकेट तूर बियाणे, ५ पॅकेट पत्ता कोबी बियाणे व ४५ नग रेनकोटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय के. के. मगरे, एसआरपीएफ ग्रुपचे शिंदे, पाेलीस उपनिरीक्षक व्ही. के. साळवे व सर्व अंमलदार यांनी सहकार्य केले. आभार रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी एन. बी. शिंब्रे यांनी मानले.
070721\img-20210707-wa0000.jpg
शेतकऱ्यांना खत व बिबियाने वाटप करतांना उपस्थित मान्यवर