गरजूंना वस्तूंचे वितरण
By admin | Published: February 11, 2016 12:14 AM2016-02-11T00:14:42+5:302016-02-11T00:14:42+5:30
पोलीस मदत केंद्र सावरगाव व सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने नक्षलग्रस्त कुलभट्टी येथे जनजागरण मेळावा ...
कुलभट्टी येथे जनजागरण : सावरगाव पोलीस व सीआरपीएफचा पुढाकार
धानोरा : पोलीस मदत केंद्र सावरगाव व सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने नक्षलग्रस्त कुलभट्टी येथे जनजागरण मेळावा आयोजित करून गरजूंना जीवनाश्यक वस्तंूचे वितरण तसेच विविध योजनांबाबत जनजागरण करण्यात आले.
जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ ११३ बटालीयनचे असिस्टंट कमांडंट सर्वेश त्रिपाठी होते. मेळाव्याला पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक माने, कुलभट्टीचे सरपंच रामलाल हिडको, सावरगावच्या सरपंच ललीता मारापी, मंडळ अधिकारी ठाकरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संघमित्रा पाटील उपस्थित होत्या.
जनतेला विविध योजनांची माहिती देऊन तसेच दुर्गम गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जनतेचा सर्वांगिन विकास व्हावा, या हेतूने मेळावा आयोजित करण्यात आला. ‘शासन आपल्या दारी’ या उक्तीप्रमाणे जनजागरण मेळाव्यात विविध विभागांच्या मार्फतीने स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पोलीस मदत केंद्र सावरगाव हद्दीतील गजामेंढी, बोदीनखेडा, केहकावाही, मोरचूल, उमरपाल, मरकेगाव, मगदंड, कनगडी, सावरगाव, कुलभट्टी आदी गावातील गरजू नागरिकांना सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा लाभ देण्यात आला. यावेळी दीड हजारावर नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)