१०१ लाभार्थ्यांना आरोग्य कार्डांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:38+5:302021-07-19T04:23:38+5:30
या योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंतच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च केंद्र सरकार मार्फत केला जात आहे. अहेरी शहरामध्ये या योजनेचे लाभार्थी अतिशय ...
या योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंतच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च केंद्र सरकार मार्फत केला जात आहे. अहेरी शहरामध्ये या योजनेचे लाभार्थी अतिशय कमी असल्याची माहिती मिळाल्यावर अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात राजे फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आठ दिवस मोठी मेहनत घेत, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता केली. १०१ आरोग्य गोल्डन कार्ड बनविले होते. राजे फाउंडेशनतर्फे लाभार्थ्यांना आरोग्य गोल्डन कार्डचे वितरण केले जाणार आहे. कार्ड वितरण कार्यक्रमाला युवा नेते अवधेशराव बाबा, ज्येष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, अमोल गुडेल्लीवार, गिरीष मद्देर्लावार, श्रीनिवास चटारे, विक्की तोडसाम, दिनेश येनगंठीवार, दिलीप पडगेवार, राकेश कोसरे, विनोद जिल्लेला, अक्षय संतोषवार आदी उपस्थित होते.
180721\1119-img-20210718-wa0011.jpg
कार्ड चे वाटप करतांना राजे अमरीश महाराज आणि अवधेश कुमार