मुक्तिपथ प्रेरकानेच केले दारूचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:12+5:302021-01-22T04:33:12+5:30
धानाेरा : धानाेरा तालुक्यात १५ जानेवारीला ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या दरम्यान दूधमाळा येथे मतदानाच्या दिवशी मुक्तिपथ तालुका प्रेरक ...
धानाेरा : धानाेरा तालुक्यात १५ जानेवारीला ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या दरम्यान दूधमाळा येथे मतदानाच्या दिवशी मुक्तिपथ तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवार यांनी मतदारांना दारूचे वाटप केल्याचा आरोप करीत पेद्दीवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काकडवेली येथील नागरिकांनी २१ जानेवारीला पत्रकार परिषदेतून केली.
दुधमाळा ग्रामपंचायतीमध्ये काकडवेली गावाचा समावेश आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी गावागावांत दारूमुक्त निवडणुकीबाबत बॅनर लावून जागृती केली. तसेच उमेदवारांकडून संकल्पपत्र भरून घेतले; परंतु मतदानादिवशी तालुका प्रेरक पेद्दीवार यांनी मतदानासाठी जाणाऱ्या ‘लाेकांना दारू प्या व मतदान करा,’ असे सांगितल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दाेन वर्षांपूर्वी काकडयेली येथे माेठ्या प्रमाणावर दारूविक्री केली जात हाेती. दारूचे पेट्राेल पंप म्हणून गाव कुप्रसिद्ध हाेते; परंतु मुक्तिपथ व गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने दारूविक्री बंद झाली. मात्र निवडणुकीच्या दिवशी पेद्दीवार यांच्या गैरवागणुकीमुळे दारूमुक्त निवडणुकीचा फज्जा उडाला. १६ जानेवारीला काकडवेलीवासीयांनी सभा घेतली. त्यानंतर १८ जानेवारीला सर्च संस्था व पाेलीस ठाण्याला निवेदन दिले; परंतु कारवाई न झाल्याने २१ जानेवारीला पत्रकार परिषदेतून माहिती देत पेद्दीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला गणसू दुगा, देवनाथ किरकाे, गाेविंदा नराेटे, उमेश किरकाे, सुरेश उसेंडी, नंदू उसेंडी, खुशाला मडावी, सुखदेव उसेंडी, दयाराम उसेंडी, देवनाथ उसेंडी, एकनाथ काेरेटी, अंताराम मडावी, मधुकर उसेंडी, रामा दुग्गा, मनाेहर उसेंडी, माया उसेंडी, अमीबाई काेरेटी, सुरेखा किरकाे, सागरथा उसेंडी, मैनाबाई किरकाे, सीताबाई दुगा, राहुल मडावी, चैतराम हाेळीकर, वासुदेव उसेंडी, झिटू दुगा, नरेश उसेंडी, सदाशिव उसेंडी, आदी उपस्थित हाेते.