नागरिकांना साहित्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:33 AM2018-03-14T01:33:12+5:302018-03-14T01:33:12+5:30
सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या वतीने कल्लेड येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
झिंगानूर : सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या वतीने कल्लेड येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्य, कपडे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोंजेडचे सरपंच वंजा मडावी, आरोग्य विभागाचे सडमेक, प्रभारी पोलीस अधिकारी रोहित बंडगर, क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक, वन विभागाचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपरिक रेला नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पोलीस शिपाई समय्या मडावी यांनी बोली भाषेत लोकांना पोलीस विभागाच्या आत्मसमर्थन योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्ग मिळणाºया लाभाचे विवेचन त्यांनी यावेळी केले. प्रभारी पोलीस अधिकारी बंडगर यांनी विविध शासकीय योजना, नक्षल गावबंदी योजनेची माहिती देऊन या योजनेअंतर्गत गावांनी लखपती व्हावे, बॅनरमधून नक्षलविरोधी प्रचार करून नागरिकांनी नक्षल्यांना थारा देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
सदर मेळाव्यात महिलांना साडी, पुरूषांना धोतर, लुंगी, चप्पल, स्टिल डब्बे तसेच विविध संसारपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय शाळकरी मुलांना स्कूल बॅग, पाटी, चप्पल, वही, पेन क्रीडा साहित्य प्रदान करण्यात आले. सरकारी निधीचा वापर करण्यासाठी लोखंडी बकेट व दोरीचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकाना गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला कल्लेड परिसरातील जवळपास १५० लोक उपस्थित होते. स्नेह भोजनाने या मेळाव्याचा समारोप झाला.