२ हजारांवर नागरिकांना मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:36+5:302021-05-11T04:38:36+5:30
जिल्ह्यात काेराेना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तसेच मृत्युसंख्याही वाढत आहे. आपले गाव निराेगी व सुदृढ राहावे यासाठी ‘माझे ...
जिल्ह्यात काेराेना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तसेच मृत्युसंख्याही वाढत आहे. आपले गाव निराेगी व सुदृढ राहावे यासाठी ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या माेहिमेनुसार येथील सरपंच सुनीता भजभुजे, उपसरपंच रामचंद्र कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने साेडियम हायपाेक्लाेराइडची फवारणी करण्यात आली, तसेच प्रत्येक कुटुंबाला सदस्यनिहाय मास्क व प्रति कुटुंबाला एक सॅनिटायझर वाटप करण्यात आले. ६०० कुटुंबातील २ हजारांवर नागरिकांना याचा लाभ देण्यात आला. काेराेना विषाणूचा संसर्ग गावात वाढू नये यासाठी सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामसचिव रामदास हसे, सदस्य माेरेश्वर वाकडे, मंगेश पिठाले, ज्ञानेश्वर बानबले, मंदा परचाके, अरुणा चनेकार, मीनाक्षी कुमरे, रसिका ठाकरे, परिचर प्रमाेद समर्थ व रवी वाघाडे हे गावात जनजागृती करीत आहेत.
===Photopath===
100521\10gad_1_10052021_30.jpg
===Caption===
मास्क वाटप करताना सरपंच सुनीता भजभुजे व उपसरपंच रामचंद्र कस्तुरे.