लायन्स क्लबतर्फे रेखाटाेल्यात साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:43 AM2021-09-10T04:43:48+5:302021-09-10T04:43:48+5:30
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासोबतच तंबाखूजन्य पदार्थ मिश्रित दंतमंजन, टूथपेस्ट, मशेरी व तपकिरीचा वापर दात घासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेड्यापाड्यात होत असल्याचे ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासोबतच तंबाखूजन्य पदार्थ मिश्रित दंतमंजन, टूथपेस्ट, मशेरी व तपकिरीचा वापर दात घासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेड्यापाड्यात होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुखाचे व फुप्फुसाचा कर्करोग, दंतरोग तसेच विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. याबाबत जागृती करण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने रेखाटोला येथे ५० लोकांना साहित्याचा लाभ देण्यात आला. यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष परवीन भामानी, कोषाध्यक्ष महेश बोरेवार, झोन चेअर पर्सन शेषराव येलेकर, डॉ. सुरेश लडके, प्रा. संध्या येलेकर, कॅबिनेट सदस्य नादीर भामानी, सदस्य गिरीश कुकडपवार, ममता कुकडपवार, सुचिता कामडी, स्मिता लडके, मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश पवार तर उपस्थितांचे आभार सचिव मंजूषा मोरे यांनी मानले.
090921\09gad_2_09092021_30.jpg
रेखाटाेला येथे साहित्य वाटप करताना लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी.