एक कोटीचा बोनस शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:48 AM2018-07-07T00:48:22+5:302018-07-07T00:49:09+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकºयांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.

Distribution of one crore bonus to the farmers | एक कोटीचा बोनस शेतकऱ्यांना वाटप

एक कोटीचा बोनस शेतकऱ्यांना वाटप

Next
ठळक मुद्देअहेरी भागात अंमल : खरीपातील शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. मात्र अहेरी कार्यालयांतर्गत अद्यापही बोनसपात्र शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी सुरू आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल २०० रूपयेनुसार बोनस देण्याची तरतूद आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने २०१६-१७ च्या खरीप हंगामातील सर्व शेतकऱ्यांना बोनस वितरित केला. सन २०१७-१८ या खरीप हंगामातील बोनस वितरणाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानाची विक्री केली, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयाची रक्कम वळती करण्यात आली आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील घाटी संस्थेंतर्गत खरकाडा केंद्रांवरील १५५ शेतकऱ्यांना ८ लाख ४५ हजार ७३६ रूपये इतका बोनस प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे अदा करण्यात आला आहे. आंधळी केंद्रावरील ३३६ शेतकऱ्यांना १४ लाख ६० हजार ७६८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. येंगलखेडा केंद्रांवरील ३१९ शेतकºयांना १८ लाख २२ हजार ८४ रूपयांचा बोनस वितरित केला आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देलनवाडी केंद्रांवरील ५२३ शेतकºयांना २५ लाख ४२ हजार ४६० रूपये, पोटेगाव केंद्रांवरील १०६ शेतकऱ्यांना ४ लाख ३३ हजार ७०० रूपये, चांदाळा केंद्रावरील ७० शेतकऱ्यांना ४८ लाख १ हजार ७४८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. तसेच मौशीखांब केंद्रावरील २१५ शेतकऱ्यांना १४ लाख ९५ हजार ४२८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सोडे केंद्रावरील १५४ शेतकºयांना ५ लाख ९९ हजार ४४४, घोट परिसराच्या आमगाव केंद्रावरील १०० शेतकऱ्यांना ५ लाख १६ हजार १६० व अड्याळ केंद्रावरील ६१ शेतकऱ्यांना ३ लाख ६१ हजार ४६० रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. उर्वरित केंद्रांवरील याद्यांची पडताळणी युध्दपातळीवर सुरू आहे.
रबी हंगामातील धान खरेदी वाढली
गतवर्षी सन २०१६-१७ च्या रबी हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालयांतर्गत मिळून सर्व केंद्रावर जवळपास ६२ हजार क्विंटलची धान खरेदी झाली होती. मात्र २०१७-१८ या रबी हंगामात जिल्ह्यात ७७ हजार १५६ क्विंटल इतकी धान खरेदी दोन्ही कार्यालयाच्या सहकारी संस्थांच्या केंद्रावर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या रबी हंगामात १५ हजार क्विंटलने धान खरेदी वाढली आहे. याचे कारण आरमोरी, कुरखेडा व इतर भागात शेतकºयांनी सिंचन विहीर, शेततळे व इतर स्त्रोताच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे शेतकºयांनी रबी हंगामातील धान पीक घेतले. २ हजार ६२ शेतकºयांनी रबी हंगामात आविकाच्या केंद्रांवर धानाची विक्री केली.

Web Title: Distribution of one crore bonus to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी