महिला बचत गटांना धान कापणी यंत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:17+5:302021-07-12T04:23:17+5:30
महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित ताटीगुडम येथे जय ...
महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित ताटीगुडम येथे जय पेरसापेन स्वयंसाहाय्यता महिला शेतकरी बचत गट ताटीगुडम, कालीकणकाली महिला शेतकरी बचत गट आसा, पूजा महिला बचत गट झिमेला, जागृती महिला बचत गट गुड्डीगुडम, भवानी महिला बचत गट इतलचेरू, लक्ष्मी बचत गट ताटीगुडम, पार्वती महिला बचत गट रेपनपल्ली आदी २२ अनुसूचित जमातीतील (एसटी) महिला शेतकरी बचत गटांना कापणी यंत्राचे वाटप भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाग्यश्री आत्राम यांनी, शेती आता जुने व पारंपरिक पद्धतीने नव्हे तर नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीने करणे काळाची गरज बनली असून, शेतात महिला शेतकऱ्यांनी अल्पावधीत भरपूर पिके घेऊन आपले आर्थिक स्तर उंचवावे, असे आवाहन केले. प्रामुख्याने धान आणि सोबतच गहू, हरभरासारखे पीक कापण्यासाठी कापणी यंत्राचा उपयोग होणार असून, याचा लाभ प्रत्येक शेतकरी महिला बचत गटांनी करून शेती सोबतच लघु व नावीन्यपूर्ण उद्योग करून आर्थिक उन्नती साधावी, असे सांगितले. यावेळी महिला बचत गटाच्या मीरा मडावी, रेखा दुर्गे, शारदा आत्राम सुनीता कुळमेथे, विनोदा आलाम व बचत गटाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होत्या
100721\0122img-20210710-wa0225.jpg
ताटीगुडम येथे महिला बचत गटांना धान कापणी यंत्राचे वाटप