कृषी मेळाव्यात धान, तूर, येरंडी बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:32+5:302021-07-12T04:23:32+5:30
सदर मेळाव्याचे आयोजन प्रभारी पोलीस अधिकारी बालाजी जोनापल्ले यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे यांच्या ...
सदर मेळाव्याचे आयोजन प्रभारी पोलीस अधिकारी बालाजी जोनापल्ले यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार दामोदर भगत हाेते. प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार धनराज वाकूडकर, सरपंच राजाराम गोटा, ग्रामसेवक अनिल नरोटे, तलाठी दीपक मेश्राम, कुलभट्टी सरपंच पडोटे आदी हजर हाेते. तसेच उपस्थित नागरिकांना शासनाच्या कृषी व इतर विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लता पुंगाटे यांनी कोरोनाची प्रतिबंधक लस सर्वांनी घ्यावी, असे सांगितले. शासकीय कागदपत्रांबाबत महत्त्व पटवून देण्यात आले.
या कृषी मेळाव्यात ५०० किलाे धान बियाणे, १५० किलाे तूर, ३० किलाे तीळ, २५ किलाे येरंडी व ५० किलाे रांजी व ४० फळझाडे मोफत वाटप करण्यात आली. तसेच कृषी विभाग धानोरा अंतर्गत दशपर्ण अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी गावातील इतर २०० ते २५० नागरिक उपस्थित होते.