रोवणी यंत्र व पॉवर टिलरचे वाटप
By admin | Published: August 2, 2015 01:37 AM2015-08-02T01:37:52+5:302015-08-02T01:37:52+5:30
मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ९० टक्के सुटीवर धान रोवणी यंत्र व पॉवर टिलर,
गडचिरोली पं. स. : ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना लाभ
गडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ९० टक्के सुटीवर धान रोवणी यंत्र व पॉवर टिलर, धान कापणी यंत्र व कोनोविडर या यंत्राचे वाटप सोमवारी स्थानिक पंचायत समितीत करण्यात आले.
यंत्र वाटप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सूर्यवंशी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. यू. पचारे, जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शेतकरी गटाला यंत्रांच्या संचाचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. ए. चौधरी, कृषी विस्तार अधिकारी दीपक जंगले उपस्थित होते. साखरा येथील स्वयंसहाय्यता गटाद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत मॅट नर्सरी तयार करण्यात आली होती.