प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान कार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:28+5:302021-09-24T04:43:28+5:30
केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मोदी केअर या नावाने ओळखले जाते. ...
केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मोदी केअर या नावाने ओळखले जाते. ही योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रतिवर्ष प्रति कुटुंब ५ लाखांपर्यंत विविध प्रकारच्या १२०९ आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्यविषयक कोणत्याही लहान व मोठ्या आजारावर उपचार तसेच शस्त्रक्रिया या योजनेतून मोफत मिळाव्या ही आरोग्यदायी योजना जनसामान्यांपर्यंत पोहचावी त्यासाठी लाभार्थींनी आयुष्यमान भारत कार्ड बनवावे, असे आवाहन आमदार डाॅ. देवराव होळी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पर्यवेक्षक मनोज उराडे यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत वासनिक यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने डाॅ. अतिरिक्त शल्यचिकित्सक सोलंकी, डाॅ. नागदेवते, डाॅ. धुर्वे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा समन्वयक डाॅ. प्रीती गोलदार, गणेश मानकर व आरोग्य मित्राने सहकार्य केले.