वैरागड येथे गरीब शेतकऱ्यांना बियाण्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:40+5:302021-06-09T04:45:40+5:30
कोरोना काळात दरम्यान अनेकांचा रोजगार हिरावला गेला. जवळ असलेले धान्य विकून कुटुंब चालवण्याची अनेकांवर वेळ आली. दिव्यांग, एकल महिला, ...
कोरोना काळात दरम्यान अनेकांचा रोजगार हिरावला गेला. जवळ असलेले धान्य विकून कुटुंब चालवण्याची अनेकांवर वेळ आली. दिव्यांग, एकल महिला, परितक्ता यांना कोरोना महामारीत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. अशा दुर्बल घटकांचा विचार करून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ कुरखेडा या संस्थेने खरीप हंगामासाठी धान बिजाई व सांधवाडीसाठी भाजीपाला व फळवर्गीय बियांणाचे वाटप सुरू केले आहे. धान बिजाईमध्ये जयश्रीराम, सारथी, क्रांती असे चांगल्या प्रतीच्या बियाणांचे वाटप संस्थेकडून होत आहे.
आरमोरी तालुक्यातील अनेक गावात जाऊन विकलांग व्यक्तींना धान बिजाईचे वाटप केले जात आहे. या उपक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारावर कार्य करणाऱ्या समन्वय संगीता तुमडे,क्षेत्र समन्वयक लक्ष्मण लंजे, महेश निकुरे यांनी या कामासाठी सहकार्य केले.