बंदीजनांना चष्म्यांचे वितरण
By admin | Published: June 4, 2016 01:18 AM2016-06-04T01:18:12+5:302016-06-04T01:18:12+5:30
येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना गुरूवारी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांच्यातर्फे चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्षांकडून मदत : चुका सुधारण्याचे आवाहन
गडचिरोली : येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना गुरूवारी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांच्यातर्फे चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रामकिरीत यादव, नगरसेवक संजय मेश्राम, कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. कारागृहातील काही बंदीजन वयस्कर आहेत. त्यामुळे त्यांना चष्म्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र तज्ज्ञांनी त्यांच्या डोळ्याची तपासणी केली होती. काही कैद्यांना व्यवस्थित दिसत नसल्याने त्यांना चष्मा लावण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी नगराध्यक्षा डॉ. अश्विनी धात्रक यांची भेट घेऊन अडचण सांगितली. त्यानुसार नगराध्यक्षांनी कैद्यांना डॉक्टरांनी सूचविलेल्या पार्इंटनुसार चष्म्याचे वितरण केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अश्विनी धात्रक यांनी कळतनकळत व्यक्तीच्या हातून चुका होतात, त्या चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. एक चूक झाली म्हणून तो व्यक्ती जीवनभर त्याच चुका करणार नाही, कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर सुखी व समाधानी जीवन जगण्याचे आवाहन केले.
नगरसेवक संजय मेश्राम यांनी बंदीजनांना कोणतीही समस्या उद्भवल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाईल, असे मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)