देसाईगंजात गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:53 PM2018-01-25T23:53:58+5:302018-01-25T23:54:15+5:30
देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी सीआरपीएफ १९१ बटालियनच्या वतीने गरजू पाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी सीआरपीएफ १९१ बटालियनच्या वतीने गरजू पाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, ईश्वर कुमरे, अॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, संस्थासचिव योगराज कुथे, पायल हरीष मोटवानी, मेरी विल्सन, माजी नगरसेविका निलोफर शेख, महादेव चांदेवार, मुख्याध्यापक जॉन उपस्थित होते.
जेसा मोटवानी यांनी मार्गदर्शन करताना गरजू महिलांना सीआरपीएफने शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्याने त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी उपस्थित इतरही मान्यवरांनी सीआरपीएफच्या या सामाजिक बांधिलकी असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
देसाईगंज येथील छाया देवराव डांगे, वैशाली नंदू मेश्राम, जयवंता बनकर, दीक्षा ढवगाये, मीना सिंगाडे या गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.