५८ दिव्यांगांना विविध साहित्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:10+5:302021-07-27T04:38:10+5:30

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मनीष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग ...

Distribution of various materials to 58 persons with disabilities | ५८ दिव्यांगांना विविध साहित्याचे वितरण

५८ दिव्यांगांना विविध साहित्याचे वितरण

Next

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मनीष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग व्यक्तींना गरजेनुसार साहित्य वाटप शिबिर तथा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ११३ बटालियनचे टोनसिंग हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नीलेश बारसे, कमलेश यादव, संगीता तुमडे, दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश मारभते, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक जायभाय आदी उपस्थित हाेते. याप्रसंगी नीलेश बारसे, पंढरी गंधकवाड व संगीता तुमळे यांनी दिव्यांगासाठी शासनाव्दारे सुरू असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

(बॉक्स)

या साहित्याचे केले वाटप

पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींची अडचण विचारात घेऊन पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील व धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या गावातील ५८ लोकांना गरजेनुसार विविध साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये हॅन्डल सायकल १९, व्हिलचेअर ९, चार्जिंग सायकल २, टॉयलेट व्हिल सायकल १, मूकबधिर मुलांना १४ किट साहित्य व २३ अंध मुलांना ब्रेललिपी मोबाइल व स्टिक देण्यात आली. तसेच कर्णबधिर लोकांना कानात लावण्याची मशीन तसेच ईतर साहित्याचे वाटप करण्यात आले. ६ दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

250721\4456img-20210724-wa0032.jpg

दिव्यांग लाभर्ती व अधिकारी पोमके येरकड

Web Title: Distribution of various materials to 58 persons with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.