जि. प.तील महाआघाडी बदलविणार अहेरीचे राजकारण

By admin | Published: March 23, 2017 12:56 AM2017-03-23T00:56:19+5:302017-03-23T00:56:19+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत.

District Aheri's politics will change the Big Bang | जि. प.तील महाआघाडी बदलविणार अहेरीचे राजकारण

जि. प.तील महाआघाडी बदलविणार अहेरीचे राजकारण

Next

आविसं, राकाँ व पालकमंत्री एकत्र : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी नवी मोट
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत. मात्र भाजपला जिल्हा परिषदेची सत्ता मिळविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदिवासी विद्यार्थी संघाची मदत घ्यावी लागली. या नव्या समिकरणाचे अहेरी विधानसभा क्षेत्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोरी व गडचिरोली हे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात नेहमीच राजघराण्याचे वर्चस्व राहत आले आहे. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अम्ब्रीशरावांचा येथे थेट सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम व आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांच्यासोबत २०१४ मध्ये झाला. या दोघांवरही मात देत अम्ब्रीशराव विजयी झालेत. मात्र अडीच वर्षाच्या काळात आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी करून आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाला तब्बल सात जागांवर यश मिळाले व दरबारी राजकारण करणाऱ्या राजे अम्ब्रीशराव आत्राम व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम या दोघांनाही शह देण्यात दीपक आत्राम यशस्वी ठरले.
जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेची मोट बांधताना अखेरच्या क्षणी तारांबळ उडाल्याने दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाची मदत भाजपला घ्यावी लागली. ही मदत घेताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक म्हणजे त्यांचे पक्षातील अंतर्गत विरोधक अम्ब्रीशराव आत्राम यांना शह देण्याचे काम पार पाडले गेले व दीपक आत्राम यांची भाजपशी जवळीक आपल्या पुढाकारातून झाली हा संदेशही पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात खा. नेते यशस्वी ठरले आहेत. दीपक आत्राम यांच्या आविसंची मदत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला होईल, हा खा. नेते यांचा या मागचा उद्देशही यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
भाजपचा जनाधार अहेरी विधानसभा क्षेत्रात वाढत असताना दीपक आत्राम यांच्यासारखा नवा मित्र भाजपने आपल्या सोबतीला जोडला आहे. त्यामुळे भविष्य काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे काम दीपक आत्रामांच्या नेतृत्वात पुढे सुरू झाल्यास याचे आश्चर्य वाटू नये, याची भीती अम्ब्रीशराव समर्थकांना आता जाणवू लागली आहे. त्यामुळेच मंगळवारच्या या घटनाक्रमानंतर पालकमंत्री समर्थक, अनेक कार्यकर्ते दीपक आत्राम भाजपात येतील काय, अशी विचारणा करू लागले आहेत.
पालकमंत्री आत्राम यांच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना आविसंला विश्वासात घेऊनच काम करावे लागणार आहे. आविसंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पालकमंत्र्यांची पठडी वेगळी आहे. त्यामुळे दीपक आत्रामांशी जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी घेतल्यास वाद निर्माण होणार नाही. अखेर पालकमंत्र्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र मोठे आहे. जिल्हा परिषदेत विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी सहकार्य केल्यास आविसंच्या कार्यपद्धतीवर त्यांना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. मात्र त्यासाठी पालकमंत्र्यांना अहेरी व गडचिरोली जिल्ह्याला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांची जि. प. तील कामे आविसंच्या माध्यमातूनही करून घ्यावी लागतील. पालकमंत्री कामाला लागले, हा संदेश लोकांपर्यंत गेल्यास पालकमंत्र्यांच्या राजकारणालाही लगाम बसणार नाही. अन्यथा आविसं या भागात आता आहे त्यापेक्षा अधिक हातपाय पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा ठरेल. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: District Aheri's politics will change the Big Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.