जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती

By admin | Published: June 20, 2017 12:48 AM2017-06-20T00:48:33+5:302017-06-20T00:48:33+5:30

आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक सिकलसेल दिन सोमवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

District awareness generation | जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती

Next

रूग्णालयात कार्यक्रम : धानोरा, अहेरी, कुरखेडा, राजगाटा चेक येथे मार्गदर्शन; महिला व किशोरवयीनांना आजारांची दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक सिकलसेल दिन सोमवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सिकलसेल आजारबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभुर्णे, डॉ. गेडाम, डॉ. नरडंगे, सिकलसेल पर्यवेक्षक गणेश कुळमेथे, टी बी पर्यवेक्षक गिरीश लेनगुरे, डेविड गुरनुले, गौतम राऊत आदी उपस्थित होते. गिरीश लेनगुरे यांनी सिकलसेल आजारबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ टेंभुर्णे यांनी सिकलसेल आजारात घ्यावयाची काळजी व नियमित तपासणी याविषयी मार्गदर्शन केले. लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.
गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चेक येथे अंगणवाडी केंद्रात जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गरोदर माता, किशोरवयीन मुलींना सिकलसेल आजार, लग्नापूर्वी व गरोदरपणात तपासणी, निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभाग व आरोग्यधाम संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला अमिर्झाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैलेश जांभुळे, सिकलसेल समन्वयक उमाकांत हर्षे, आरोग्य सेवक अनिल मंगर, जयंत कत्तुरवार, सविता जेंगठे व गावातील मुली तसेच महिला उपस्थित होत्या.
अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने आयसीटीसी विभागात जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सिकलसेल पर्यवेक्षक प्रवीण दुर्गे यांनी सिकलसेल वाहक व सिकलसेल रूग्णांनी विवाहापूर्वी तपासणी करून भावी पिढीला होणारा संभाव्य धोका टाळावा, सिकलसेल रूग्णांनी ओळखपत्रे बनवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने निरोगी आरोग्यासाठी पाणी उकडून प्यावे, मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. संचालन सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप डेकाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी व्यंकटेश डिकोंडा, निखिल कोंडापर्ती, पडको, विनित खोके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.
कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आरोग्यधाम स्वयंसेवी संस्थेच्या वतीने रक्तदात्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी संत निरंकारी मंडळाचे प्रकाश रामानी, दिलीप निरंकारी, अजय पुस्तोडे व अन्य लोकांचा सिकलसेल रूग्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्वा, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ लांजेवार, आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे उपस्थित होते. संचालन विजय सोनटक्के तर आभार खुशलता मलगाम यांनी मानले.

Web Title: District awareness generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.