जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:24 PM2018-11-26T22:24:39+5:302018-11-26T22:24:57+5:30

सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून गडचिरोलीच्या बँकेला हा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार १७ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे.

District Bank receives 'Banco Blue Ribbon' award | जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

Next
ठळक मुद्देविविध निकषांमधून निवड : देशभरातील सहकारी बँकांमधून मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून गडचिरोलीच्या बँकेला हा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार १७ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे.
सहकार क्षेत्रातील जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतुने बँको समितीमार्फत सदर पुरस्कार दिला जातो. २०१७-१८ या वर्षात एक हजार ते दोन हजार कोटीच्या ठेवी, नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेने एनपीएचे प्रमाण तसेच सीएसआरचे प्रमाण आदी निकषांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पात्र ठरली आहे. या बँकेला यापूर्वी २०१७-१८ या वर्षाचा ‘उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा’ प्रथम पुरस्कार तसेच ‘बँको-२०१६’ च्या प्रथम पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण ५५ शाखा आहेत. ४ लाख २६ हजार ग्राहकांना बँकींग सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. या बँकेने मार्च २०१८ ला दोन हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला. नुकतेच बँकेने ग्राहकांकरिता मोबाईल बँकींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर पुरस्कार बँकेचे सर्व खातेदार, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली.

Web Title: District Bank receives 'Banco Blue Ribbon' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.