जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:56 AM2018-07-07T00:56:50+5:302018-07-07T00:57:19+5:30
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या.
जिल्ह्याधिकाऱ्यांचा हस्ते नुकतेच ३० जून ला ताडगाव व भामरागड येथील महसूल मंडळाच्या नूतन इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पाच दिवसांनी पुन्हा भामरागड तालुक्यात गुप्त दौरा करून येथील शासकीय आश्रम शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान या भागात कर्तव्यावर सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकंदरीत पावसाळ्यात अतिदुर्गम भागात कोणतेच वरिष्ठ अधिकारी सहसा जात नाही मात्र, गडचिरोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर शेखर सिंह यांनी प्रत्येक तालुक्यात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातही त्यांनी भेट दिली होती, हे विशेष.
एकंदरीत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत असून त्यांच्या अशा दुर्गम भागातील भेटीमुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागड, सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात शिक्षण, वीज, आरोग्य या मूलभूत सेवा पोहोचल्या पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने त्यांनी दौरा केला.