जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

By admin | Published: August 3, 2014 12:06 AM2014-08-03T00:06:05+5:302014-08-03T00:06:05+5:30

महसूल कर्मचारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल दिनापासून जिल्हाभरातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहे. १ आॅगस्टपासून चामोर्शी व आरमोरी येथील तहसील

District collector's agitation continues | जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

Next

चामोर्शी/आरमोरी : महसूल कर्मचारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल दिनापासून जिल्हाभरातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहे. १ आॅगस्टपासून चामोर्शी व आरमोरी येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाचे प्रशासन ठप्प झाले आहे. चामोर्शी येथे नायब तहसीलदार खंडारे, चटगुलवार, मंथनवार व इतर सर्व लिपिक आंदोलनात सहभागी झाले आहे.
शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदर आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. या आंदोलनाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, जि. प. सदस्य संध्या दुधबळे, मारोतराव सोमनकर आदींनी भेट दिली.
आरमोरी तहसील कार्यालयाचेही कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे. धानोरा येथे आंदोलनात एक मंडळ अधिकारी, ८ अव्वल कारकून, १० लिपिक, ९ शिपाई तसेच १ वाहनचालक सहभागी झाले आहे. तालुक्यातील तब्बल २९ महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. मागण्या निकाली काढल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार या महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: District collector's agitation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.