जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:57 PM2019-07-02T22:57:49+5:302019-07-02T22:58:10+5:30

काही जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २५ जून रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेतली. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतींची माहिती मागितली असून प्राधान्यक्रमाने शाळांची दुरूस्ती केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी लोकमतशी बोलताना दिली होती.

District Council Schools will be repaired | जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होणार

जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होणार

Next
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : जिल्हा नियोजन समितीचा जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काही जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २५ जून रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेतली. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतींची माहिती मागितली असून प्राधान्यक्रमाने शाळांची दुरूस्ती केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी लोकमतशी बोलताना दिली होती.
जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांना स्लॅबच्या इमारती बांधून देण्यात आल्या आहेत. मात्र काही शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विशेष करून ज्या शाळा जुन्या आहेत. त्या शाळांच्या इमारती कौलारू आहेत. काळाच्या ओघात या इमारतींचे लाकडी फाटे कुजले, कवेलू गळून पडले आहेत. काही शाळांच्या छतांवर कवेलू ऐवजी सिमेंट पत्रे टाकून डागडूजी करण्यात आली आहे. मात्र या इमारती पावसाळ्यात गळत असल्याने विद्यार्थी व शिक्षक त्रस्त झाले आहेत.
शाळांची विदारक अवस्था जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात यावी, यासाठी लोकमतने दैैनावस्था असलेल्या जिल्हाभरातील शाळांची माहिती व छायाचित्रांचे वृत्त २५ जूनच्या अंकात प्रकाशित केले. यासाठी विशेष पान काढण्यात आले होते. लोकमतच्या या वृत्ताने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली. २८ जून रोजी शिक्षण समितीची बैठक बोलाविण्यात आली.
या बैठकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी मोडकळीस येण्याच्या मार्गावर असलेल्या तसेच धोकादायक इमारती ज्यामध्ये वर्ग भरत आहेत. अशा शाळांची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मागितली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध झाला आहे. ज्या ठिकाणी इमारतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्या शाळेला प्राधान्य देऊन इमारती बांधल्या जाणार आहेत. लोकमतच्या वृत्ताने शाळांचे संकट दूर होणार असल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षकांनी लोकमतचे आभार मानले आहे.
काही शाळांना इमारती आहेत. मात्र त्या शाळांमध्ये शैक्षणिक सोयीसुविधा नाही, अनेक शाळांची वीज कापल्या गेली आहे, त्यामुळे डिजिटल साधने धूळ खात पडून आहेत. संरक्षक भिंतीअभावी डुकरे व जनावरंचा हैैदोस शाळांमध्ये दिसून येत आहे. संरक्षक भिंत बांधकमासाठीही निधी आवश्यक आहे.
सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार
शाळा बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाला आहे. मोडकळीस आलेल्या शाळांची माहिती मागविण्यात आली आहे. १७ जुलैै रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेत शाळा इमारत बांधकामांचा ठराव मांडला जाईल. संबंधित शाळांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
यापूर्वी सर्व शिक्षा अभियानतर्फे शाळा व वर्गखोली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. आता मात्र सर्व शिक्षा अभियानला निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शाळा बांधकाम करावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत जिल्हा नियोजन समितीतून निधी आणला आहे. सदर निधी बांधकामावर खर्च केला जाणार आहे.

Web Title: District Council Schools will be repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.