जिल्हा सामान्य रूग्णालय राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:58 PM2018-02-26T23:58:17+5:302018-02-26T23:58:17+5:30
राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
रूग्णालयातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट, रूग्णालयाचा परिसर, रूग्णांना दिली जाणारी सेवा आदी बाबींवर कायाकल्प अवॉर्ड स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंतची सर्वच रूग्णालये सहभागी होतात. २०१७-१८ कायाकल्प अवॉर्डची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीत गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यातून प्रथम क्रमांक बहुमान पटकाविला आहे. ५० लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय क्रमांक बारामती येथील महिला रूग्णालयाने पटकाविला आहे. जिल्हा रूग्णालय रत्नागिरी, जिल्हा रूग्णालय औंद व जिल्हा रूग्णालय वर्धाला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यातील रूग्णालयाने राज्यातील इतर रूग्णालयांना मागे टाकत राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविल्याने येथील डॉक्टर व कर्मचाºयांचे कौतुक केले जात आहे.