राज्यापेक्षा जिल्ह्याचा काेराेना रिकव्हरी दर अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:32+5:30
१८ मे राेजी जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काेराेना रूग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. काेराेना रूग्ण आढळून येत असले तरी त्यातील किती रूग्ण दुरूस्त हाेतात. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या एकात्मिक राेग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दर दिवशी काेराेनाच्या स्थितीचा आढावा घेतल्या जाते. २० डिसेंबर राेजी राज्यात एकूण काेराेना बाधितांची संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ हाेती. त्यापैकी १७ लाख ८३ हजार ९०५ रूग्ण बरे हाेऊन घरी परतले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनापासून रूग्ण बरे हाेण्याच्या राज्याच्या दराच्या तुलनेत जिल्ह्याचा दर जवळपास १ टक्याने अधिक आहे. यावरून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनाची स्थिती समाधानकारक असल्याचा अंदाज येते.
१८ मे राेजी जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काेराेना रूग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. काेराेना रूग्ण आढळून येत असले तरी त्यातील किती रूग्ण दुरूस्त हाेतात. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या एकात्मिक राेग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दर दिवशी काेराेनाच्या स्थितीचा आढावा घेतल्या जाते. २० डिसेंबर राेजी राज्यात एकूण काेराेना बाधितांची संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ हाेती. त्यापैकी १७ लाख ८३ हजार ९०५ रूग्ण बरे हाेऊन घरी परतले. यावरून राज्यात रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के एवढे आहे. तर जिल्ह्यात २० डिसेंबर राेजी एकूण बाधित रूग्णांची संख्या ८ हजार ८०४ एवढी हाेती. त्यापैकी ८ हजार ३७५ रूग्ण बरे झाले. यावरून बरे हाेण्याचे प्रमाण ९५.१३ टक्का एवढा आहे. राज्याच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण थाेडेफार अधिक आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. शेतीमध्ये माेठ्या प्रमाणात काम करावे लागत असल्याने त्यांचे शरीर काटक आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांची राेगप्रतिकारक क्षमता तुलनेने अधिक आहे. याचा लाभ काेराेनाच्या संकटात हाेत आहे. जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ९६ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असला तरी यातील बहुतांश रूग्ण वयाेवृद्ध हाेते. तर काही रूग्ण इतर आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना काेराेनाची लागण हाेऊन मृत्यू झाला. मागील आठ दिवसांमध्ये पुन्हा काेराेना रूग्णांची संख्या घटत आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बाधितही कमी
पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात एकूण काेराेनाबाधित रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात एकूण काेराेनाबाधित १२ हजार ३०५, गाेंदिया १३ हजार ४५६, चंद्रपूर २२ हजार ४७०, नागपूर १ लाख २१ हजार ५४७, गडचिराेली जिल्ह्यात ८ हजार ८०४ रूग्ण आढळले आहेत.