जिल्ह्यात २ हजार ६२ घरकूल वाढले

By admin | Published: March 12, 2017 01:55 AM2017-03-12T01:55:54+5:302017-03-12T01:55:54+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यापूर्वी गडचिरोलीच्या जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेला सन २०१६-१७ या वर्षाकरिता

The district has increased to 62 thousand households | जिल्ह्यात २ हजार ६२ घरकूल वाढले

जिल्ह्यात २ हजार ६२ घरकूल वाढले

Next

संचालकांचे आदेश धडकले : सुधारित उद्दिष्ट प्राप्त
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यापूर्वी गडचिरोलीच्या जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेला सन २०१६-१७ या वर्षाकरिता ३ हजार ८८२ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आता राज्य शासनाने नवे सुधारित उद्दिष्ट दिले असून या उद्दिष्टानुसार पूर्वीच्या तुलनेत तब्बल २ हजार ६२ घरकुलांची वाढ झाली आहे. यामुळे वंचितांना आता हक्काचे घर मिळणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण गृह निर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक भारत शेंडगे यांचे आदेश जि.प.च्या डीआरडीएला प्राप्त झाले आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ च्या संचालक शेंडगे यांच्या पत्रानुसार एकूण ५ हजार ७४४ घरकुलाचे सुधारीत उद्दिष्ट गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाला २०१६-१७ या वर्षासाठी देण्यात आले आहेत. नव्या सुधारीत उद्दिष्टानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात ४५७ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी १ हजार २६६, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ३ हजार ७०५, अल्पसंख्यांक प्रवर्गासाठी १२०, इतर प्रवर्गासाठी ६५३ व एसएचजी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी तीन घरकुलांचा समावेश आहे. सुधारीत उद्दिष्टानुसार जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेने बाराही पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकूल मंजूर केले आहेत. घरकूल लाभार्थ्यांना थेट आॅनलाईनरित्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम शासनाकडून मिळणार आहे. यापूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या उद्दिष्टानुसार गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ६९८, अनुसूचित जमातीसाठी २ हजार २६९, अल्पसंख्यांकासाठी २६८ व इतर प्रवर्गासाठी ४४७ असे एकूण ३ हजार ६८२ असे एकूण ३ हजार ६८२ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आता नव्या सुधारीत उद्दिष्टानुसार गडचिरोली जिल्ह्यात २ हजार ६२ घरकूल अधिकचे होणार आहेत.

 

Web Title: The district has increased to 62 thousand households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.