ओबीसी व गैरआदिवासींच्या प्रश्नांवर जिल्हाभर आंदोलन
By admin | Published: January 4, 2016 03:57 AM2016-01-04T03:57:18+5:302016-01-04T03:57:18+5:30
जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण, राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासींवर झालेला अन्याय,
गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण, राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासींवर झालेला अन्याय, अनुसूचित क्षेत्राची अस्पष्टता, शिष्यवृत्ती व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या या सर्व प्रश्नांवर जानेवारी महिन्यात शासनाच्या विरोधात एक दिवसीय जिल्हा बंद व विशाल मोर्चा काढण्यात येईल, असा एकमुखी निर्णय ओबीसी व गैरआदिवासींच्या विविध संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी संघटनांची रविवारला महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरूण मुनघाटे, कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, दादाजी चापले, दादाजी चुधरी, ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी, प्रा. अशोक लांजेवार, बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष भास्कर बुरे, जन आंदोलन समितीचे आशिष पिपरे, प्रविण धोटे, विजाभज संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रशांत गव्हारे, यदूनाथ चापडे, पं.स. प्रमोद भगत, प्रभाकर वासेकर, हिरामन कुकुडकार, सुरेंद्र सोमनकर, प्रविण नैताम, मंगेश वासेकर, नरेश महाडोरे, पी. एस. कातरकर, विलास बुरे, विनायक कुनघाडकर, केशवराव सामृतवार, पांडुरंग घोटेकर, विजय वैरागडे, गुरूदेव भोपये आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील ओबीसी व गैर आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी केले. (स्थानिक प्रतिनिधी)