जिल्ह्यात दमदार पावसाने रोवणी सुरुवात

By admin | Published: August 14, 2015 01:45 AM2015-08-14T01:45:46+5:302015-08-14T01:45:46+5:30

बुधवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात धानपिकाच्या रोवणीला वेग आला आहे.

In the district, rampant rains started with heavy rain | जिल्ह्यात दमदार पावसाने रोवणी सुरुवात

जिल्ह्यात दमदार पावसाने रोवणी सुरुवात

Next

दीड महिन्यानंतर आगमन : तीन तालुक्यात जोरदार पाऊस
गडचिरोली : बुधवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात धानपिकाच्या रोवणीला वेग आला आहे.
मागील दीड महिन्यांपासून पाऊस नसल्याने रोवणीची कामे थांबली होती. दीड महिन्याचा कालावधी उलटूनही केवळ ४५ हजार हेक्टरवर रोवणी झाली होती. पावसाअभावी रोवलेले धानही करपायला लागले होते. शेतकरी चिंतातूर झालेला असतानाच बुधवारी अचानक रात्री पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धानाच्या बांध्यांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे धान पिकाच्या रोवणीला मंगळवारपासून आणखी सुरुवात झाली आहे.
चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. चामोर्शी तालुक्यात सुमारे २१० मिमी, आरमोरी तालुक्यात १२१ मिमी व अहेरी तालुक्यात ९९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप व कधी उन्हाचे चटके असा ऊनपाऊस खेळ सुरू होता. (नगर प्रतिनिधी)
गोसेखुर्दचे पाणी सुटल्याने वैनगंगा दुथडी भरणार
गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे दीड मीटरने, तर १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ७६७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय आज रात्री साडेआठ वाजतापासून उद्या(ता.१४) रात्रीपर्यंत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तविला आहे. जोरदार पाऊस पडल्याने गडचिरोली जिल्हयातील वैनगंगा नदीसह खोब्रागडी, गाढवी, कठाणी, सती, चुलबंद या लहान नद्यांना येत्या २४ तासात पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: In the district, rampant rains started with heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.