जिल्हाभरात २४ तासांत १२.९ मिमी पाऊस

By admin | Published: June 11, 2017 01:34 AM2017-06-11T01:34:19+5:302017-06-11T01:34:19+5:30

शुक्रवारी दुपारपासून ढगाळी वातावरण निर्माण होऊन वैरागड, अमिर्झा परिसरासह कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात चांगला पाऊस झाला.

District receives 12.9 mm rain in 24 hours | जिल्हाभरात २४ तासांत १२.९ मिमी पाऊस

जिल्हाभरात २४ तासांत १२.९ मिमी पाऊस

Next

भामरागडात सर्वाधिक : गुरूवारपर्यंत १६ मिमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शुक्रवारी दुपारपासून ढगाळी वातावरण निर्माण होऊन वैरागड, अमिर्झा परिसरासह कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात चांगला पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने एकूण सरासरी १२.९ मीमी पावसाची नोंद घेतली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासांत गडचिरोली तालुक्यात १४.४ मिमी, कुरखेडा ७ मिमी, आरमोरी ७.४ मिमी, अहेरी १० मिमी, एटापल्ली ७.८ मिमी, धानोरा १४.२ मिमी, कोरची ८ मिमी, मुलचेरा १३.६ मिमी तसेच भामरागड तालुक्यात सर्वाधिक ४४.४ मिमी पाऊस झाला आहे. त्या खालोखाल चामोर्शी तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस झाला असून येथील आकडेवारी ३१ मिमीआहे.
मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारला जिल्ह्याच्या अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे आता शेती मशागतीच्या कामास शेतकऱ्यांनी वेग घेतला आहे. धानोरा तालुक्यात चांगला पाऊस झाला. मुरूमगाव येथे ६.४ मिमी, चातगाव २५ मिमी, पेंढरी १५.४ मिमी व धानोरा येथे गेल्या २४ तासात सकाळी ८ वाजेपर्यंत १० मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

Web Title: District receives 12.9 mm rain in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.