जिल्हा शल्य चिकित्सकांनी रूग्णालयांची केली पाहणी

By Admin | Published: September 22, 2016 02:28 AM2016-09-22T02:28:25+5:302016-09-22T02:28:25+5:30

एटापल्ली तालुक्यात मागील आठवड्यात गॅस्ट्रोने तीन रूग्ण दगावले. तसेच तालुक्यात असलेल्या आजाराची दखल

District Surgeon examined the hospitals | जिल्हा शल्य चिकित्सकांनी रूग्णालयांची केली पाहणी

जिल्हा शल्य चिकित्सकांनी रूग्णालयांची केली पाहणी

googlenewsNext

चर्चा : एटापल्ली, अहेरी, भामरागडला भेट
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात मागील आठवड्यात गॅस्ट्रोने तीन रूग्ण दगावले. तसेच तालुक्यात असलेल्या आजाराची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी एटापल्ली, भामरागड येथील ग्रामीण व अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयाला बुधवारी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व आरोग्य अधिकाऱ्यांशी विविध बाबीवर चर्चा केली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन येथील शवविच्छेदन गृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच रूग्णालयातील अनेक वॉर्डांना भेट देऊन व्यवस्था जाणून घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावेश वानखेडे यांच्याकडून तालुक्यातील आरोग्यविषयक स्थिती जाणून घेतली. त्यानंतर डॉ. खंडाते यांनी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली व येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्याशी चर्चा केली. भामरागड ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन डॉ. शृंगारे यांच्याशी आरोग्य समस्या तसेच रूग्णालयातील व तालुक्यातील स्थितीचा आढावा घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: District Surgeon examined the hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.