जिल्हाभर वृक्ष लागवड मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:23 PM2019-07-03T22:23:28+5:302019-07-03T22:24:00+5:30

महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीमेस शुभारंभ झाला असून सोमवारी व मंगळवारी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. सदर उपक्रमात शाळा, महाविद्यालयासह विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने योगदान देण्यात आले.

District-tree plantation campaign | जिल्हाभर वृक्ष लागवड मोहीम

जिल्हाभर वृक्ष लागवड मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देविविध उपक्रम : लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीमेस शुभारंभ झाला असून सोमवारी व मंगळवारी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. सदर उपक्रमात शाळा, महाविद्यालयासह विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने योगदान देण्यात आले.
श्री साई स्कूल आॅफ नर्सिंग आरमोरी
श्री साई स्कूल आॅफ नर्सिंग आरमोरी येथे १ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साळवे, प्राचार्य नेहा ओळख आदी उपस्थित होते. संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. संचालन प्रीती उईके तर आभार नेहा खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भूषण ठाकर, मेश्राम, केशव सेलोटे, वासुदेव फुलबांधे, पिंकी साळवे यांच्यासह एएनएम प्रथम व द्वितीय सत्राच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांचे असलेले महत्त्व पटवून दिले. प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावली. जेवढी झाडे लावण्यात आली. तेवढ्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर सोपविण्यात आली. त्यामुळे लावलेली झाडे जगतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुभाषनगर येथे वृक्षारोपण
चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषी स्पंदन संघाच्या वतीने सुभाषनगर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून कृषी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक मडावी, कृषी सहायक प्रवीण पाटील, उपसरपंच देवराव नैैताम, कृषीमित्र उमेश भांडेकर, प्रियंका वासनिक, पल्लवी वन्नेवार, प्रिया वाकुडकर, वैैष्णवी झाडे आदी उपस्थित होते.
मासाहेब आश्रमशाळा, कोटरा
कोरची तालुक्यातील कोटरा येथील अनुदानित मासाहेब माध्यमिक आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी क्षेत्र सहायक के. जे. उमरे, वनरक्षक एल. आर. चौधरी, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील अवसरे, प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे, अरविंद काशिवार, सुधाकर कामडी, नमो मेश्राम, रमेश शहारे, रमेश नान्हे, राकेश कुळसंगे, घनश्याम वनवे, सुशील म्हस्के, नितीन पित्तुरवार, वसंत बुरे, संदीप चौरे उपस्थित होते.
कारसपल्लीत वृक्षारोपण
सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या कारसपल्ली येथील रोपवनात पाच हजार वृक्ष लावण्यात आले. उपवनसंरक्षक सुनील कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवाद, सुनील खरात, नायब तहसीलदार एच. एस. सय्यद, वन परिक्षेत्राधिकारी वि. वा. नरखेडकर, वनपाल एल. एम. शेख, वनरक्षक शेख, रवी रालबंडीवार, मधुकर कोल्लुरी यांच्यासह जि. प. शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, वन कर्मचारी, मेडाराम, कारसपल्ली, नारायणपूर येथील नागरिक उपस्थित होते.
जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा
येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. किरमिरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय मुरकुटे, प्रा. डॉ. गणेश चुधरी, प्रा. डॉ. पंढरी वाघ, डॉ. लांजेवार, डॉ. डी. बी. झाडे, डॉ. ढाकळे, प्रा. खोब्रागडे, प्रा. करमणकर, प्रा. रणदिवे, प्रा. आवारी, प्रा. ज्ञानेश बनसोड, प्रा. डॉ. दुपारे आदी उपस्थित होते. यावेळी आवळा, काजू, सीताफळ, फणस आदी झाडे लावण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सूर्यारावपल्ली
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कैैवल्य एज्युकेशन फाऊंडेशनचे संयोजक अभय प्रतापसिंह यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख एल. आर. चेडे, मुख्याध्यापक के. जी. गागारपूवार, सहशिक्षक तन्नीर आदी उपस्थित होते.
महिला महाविद्यालय, गडचिरोली
गडचिरोली येथील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ३ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हंसा तोमर, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, डॉ. नंदा सातपुते यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होेते. यावेळी एकूण ८० झाडे लावण्यात आली. लावलेली झाडे जगविण्याचा संकल्प उपस्थित विद्यार्थ्यांनी केला.

Web Title: District-tree plantation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.