वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 05:00 AM2021-09-16T05:00:00+5:302021-09-16T05:00:16+5:30

गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे.

The district was shaken by the terror of tigers and leopards | वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शेतशिवारात पाळीव जनावरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघबिबट्यांकडून हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत आठ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे. अशातच आता जंगलात वाघबिबट्यांची संख्या वाढायला लागली आहे. शेतावर जात असलेल्या नागरिकांवरही वाघ व बिबट्यांचे हल्ले हाेत आहेत. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. शेतावर जाणारा रस्तासुद्धा जंगलातून जाते. 
मंगळवारी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथील भीमदेव नागापुरे या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. गाेंडपिंपरी तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आष्टी परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले हाेते. मनाेज तिरूपती देवावार या सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर धानाेरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावातील एका महिलेच्या घरी बिबट्या शिरला. वनविभागाने त्याला पकडून जेरबंद केले. वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आठ दिवसांपासून वाघ मिळेना
- नरभक्षक असलेल्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील स्पेशल टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही टीम वाघाचा शाेध घेत आहे. मात्र वाघ मिळाला नाही.

आष्टीतील बिबट्याने अखेर मुलाचा बळी घेतलाच
मागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर आहे. काेंबड्या, शेळ्या, बकरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केले. या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत हाेती. मात्र, वन विभागाने लक्ष दिले नाही. अखेर साेमवारी पेपर काॅलनीतील एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात बालक बचावला. बुधवारी पुन्हा आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कं. येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला केला. त्यात बालक ठार झाला. आता तरी या बिबट्याला जेरबंद करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

Web Title: The district was shaken by the terror of tigers and leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.