विकासासाठी जिल्हा दत्तक घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:02 PM2018-03-11T23:02:36+5:302018-03-11T23:02:36+5:30
महाराष्ट्रातील आदिवासी नक्षलग्रस्त व अतिमागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण व्हाव्या. रिकाम्या हाताला काम मिळावे.
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : महाराष्ट्रातील आदिवासी नक्षलग्रस्त व अतिमागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण व्हाव्या. रिकाम्या हाताला काम मिळावे. सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गडचिरोली जिल्हा दत्तक घेणार, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकासमंत्री महादेव जाणकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रविवारी चामोर्शी येथील शरदचंद्र पवार, कला महाविद्यालयाच्या प्रांगणात शेतकरी, शेतमजूर, युवक महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष माधुरी पालीवाल, पूर्व विदर्भ सचिव संजय कन्नावार, विदर्भ अध्यक्ष मनोज साबळे, पूर्व विदर्भ सहकार आघाडीचे राजू झरकर, व्यापारी संघ अध्यक्ष गौतम गुंदेजा, दुग्ध विकास भंडाराच्या संचालिका निमा हलमारे, रासप प्रदेश सरचिटणीस अॅड. गजानन चौगुले, अॅड. अभिजीत ऋषी, कृउबासचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, बंडूजी ऐलावार, निबंधक डी. टी. सरपाते, मुरलीधर बुरे, उद्योजक जयसुखलाल दोषी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जाणकर म्हणाले, शेतकरी, युवक व बेरोजगारांनी मत्स्य, पोल्ट्री, गोटफार्म व दुग्ध विकासाकडे वळून स्वत:च रोजगार निर्माण करावा व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. गडचिरोली येथे मत्स्य बिज प्लान्टची निर्मिती केली जाईल. ओबीसी, एनटी व खुल्या प्रवर्गातील महिलांना ५० टक्के सबसिडीवर स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे आश्वासन ना. जाणकर यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यात मोठे उद्योग नाही. येथील जनता प्रामाणिक असूनही त्यांना न्याय मिळत नाही. शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना सवलती मिळणे आवश्यक आहे. गणपूर, कळमगाव येथील बॅरेज रखडले असून त्यासाठी ३०० कोटी रूपयांची गरज आहे, प्रतिपादन अतुल गण्यारपवार यांनी केले.
कार्यक्रमाला संचालक अरूण बंडावार, गोसाई, सातपुते, सुधाकर निखाडे, जानकीराम कुसनाके, शंकर वंगावार, विनायक आभारे, गणपती भंडारे, रामचंद्र ब्राह्मणकर, निलेश गद्देवार, बाजीराव गावडे, सतीश रॉय, चंद्रकांत दोषी, शामराव लटारे, अनिल नैताम, कौशल्याबाई पोरटे, बयनाबाई मडावी, राजू खापरे, निरज राजकोंडावार, गोपाल पिपरे, अरूण बंडावार, शामराव पोरटे, नामदेव सोनटक्के, अरूण लाकडे, साईनाथ पेशट्टीवार, मंजुषा चलकलवार, सरोज कोंडूकवार, व्यवस्थापक बबनराव श्रीकुंटवार, राजू आत्राम, संजय श्रुंगारपवार, दीपक तातावार, प्रशांत कोडगीरवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी केले. संचालन निलेश गद्देवार तर आभार प्रा. मनोज नागोसे यांनी केले. यावेळी नामदार महादेव जाणकर व अतुल गण्यारपवार यांचा सत्कार करण्यात आला.
सहा कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत २ कोटी ३८ लाख रूपयांच्या स्व:निधीतून शेतकऱ्यांसाठी थंड पाण्याची मशीन बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर संरक्षण भिंत, धर्मकाटा, गोदामाचे नुतनीकरण, शेतकरी माल साठवणूक केंद्र यांचे लोकार्पण करण्यात आले. ५५ लाखांच्या ओपन शेडचे भूमीपूजन केले. यामुळे शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्धा होणार आहेत.
च्चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या तीन कोटीच्या निधीतून स्व. भैय्याजी पाटील दीक्षित शॉपींग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात आले. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.