दिव्यांग शेतकरी, एकल महिलांना शेती, परसबागेचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:18+5:302021-07-01T04:25:18+5:30
कुरखेडा : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, कुरखेडा’ यांच्या वतीने संस्थेच्या महात्मा गांधी सभागृहात ‘दिव्यांग शेतकरी व एकल महिला यांना ...
कुरखेडा : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, कुरखेडा’ यांच्या वतीने संस्थेच्या महात्मा गांधी सभागृहात ‘दिव्यांग शेतकरी व एकल महिला यांना पर्यावरणीय शेती व पौष्टिक परसबाग’ या विषयावर मंगळवारी एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी खत, बियाणे व बाजारव्यवस्थेसह विविध बाबींची माहिती जाणली.
प्रशिक्षणात हवामान बदलाचे उत्पादनावर होणारे परिणाम, उत्पादनातील अनिश्चितता, पर्यावरणीय शेतीची गरज, पर्यावरणीय शेती करताना कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया, बीजनिवड प्रक्रिया, पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन आणि संगोपन, पारंपरिक पीक लागवड तसेच पारंपरिक खतांची निर्मिती, त्याचे प्रकार, आजची बाजार व्यवस्था तसेच शासकीय योजना, दिव्यांग व्यक्ती, शेतकरी, उत्पादक कंपनीची पुढील वाटचाल या विषयावर प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. प्रशिक्षण सत्रात ‘उपजीविका अधिकार’ या विषयाचा क्षेत्र समन्वयक तथा कृषी विषयतज्ज्ञ प्रतिमा नंदेश्वर यानी मार्गदर्शन केले. यशस्वितेकरिता जिल्हा समन्वयक संगीता तुमडे, क्षेत्र समन्वयक लक्ष्मण लंजे यांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव व एकल महिला शेतकरी हजर होते.
===Photopath===
300621\img-20210625-wa0126.jpg
===Caption===
प्रशिक्षण सत्राला मार्गदर्शन करताना प्रतिमा नंदेश्वर