दिव्यांग शाळा शिक्षकांना लाॅकडाऊन संपेपर्यंत मिळणार वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:28 AM2021-06-04T04:28:03+5:302021-06-04T04:28:03+5:30
राज्यातील दिव्यांग कल्याण विभाग तसेच समाज कल्याण विभागाअंतर्गत अंध, अपंग शाळा, मूकबधिर, कर्णबधिर निवासी शाळा, मतिमंद शाळा, औद्योगिक निवासी ...
राज्यातील दिव्यांग कल्याण विभाग तसेच समाज कल्याण विभागाअंतर्गत अंध, अपंग शाळा, मूकबधिर, कर्णबधिर निवासी शाळा, मतिमंद शाळा, औद्योगिक निवासी कार्यशाळा आहेत. ज्या शाळांची नूतनीकरणाची मुदत संपली त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र कोरोनाची दुसरी लाट पाहता, सर्व शाळांचे प्रस्ताव शासनदरबारी अडले आहेत. राज्यातील सर्व दिव्यांग शाळेतील शिक्षकांचे मार्चपासूनचे वेतन अदा करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. आ. नागो गाणार, संघटनेचे पदाधिकारी व प्रधान सचिव श्याम तागडे यांची मंत्रालयात बैठक झाली. ३१ मे रोजी आदेश काढले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत दिव्यांग शाळेतील शिक्षकांचे वेतन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना आदेश दिले. त्यामुळे राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षकांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजीव गांधी अपंग (अस्थिव्यंग) विदयालय, देसाईगंज, एकता मूकबधिर विदयालय, गडचिरोली, निवासी मूकबधिर, नवेगाव काॅम्प्लेक्स, चाणाक्य मतिमंद, आलापल्ली या शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.