गाेरगरिबांची दिवाळी यावर्षी डाळ आणि साखरेविनाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:30+5:30
गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : धान्य मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त रेशन दुकानातून डाळ व साखर दिली जात हाेती. यावर्षी मात्र अंत्याेदयचे लाभार्थी वगळता इतरांना डाळ व साखर दिली जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून या वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अंत्याेदय कार्डधारकांना मात्र पूर्वी प्रमाणेच प्रती कार्ड एक किलाे साखर मिळणार आहे.
पुन्हा एक महिना मिळणार माेफत धान्य
- काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मे ते नाेव्हेंबर महिन्यापर्यंत माेफत धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत पुन्हा नाेव्हेंबर महिन्यात माेफत धान्य मिळणार आहे. काेराेनाची लाट आता ओसरली आहे. व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे माेफत धान्याची याेजना पुढे चालू राहील हे जवळपास कठीण आहे.
- मागील महिन्यात प्रती व्यक्ती दाेन किलाे मका देण्यात आला हाेता. या महिन्यात मात्र मका न देता गहूच दिले जाणार आहेत. अत्यंत कनिष्ठ दर्जाचा मका दिला जात असल्याने लाभार्थी या मक्याचे काहीच करू शकत नाही. हा मका व्यापाऱ्याला विकला जाते.
दिवाळी कशी साजरी करायची?
काेराेनाची लाट ओसरल्याने आर्थिक व्यवहार आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काेराेनाच्या कालावधीत राेजगार न मिळाल्याने कर्ज काढून जीवन जगावे लागले. त्या कर्जाचा बाेजा अजूनही उतरला नाही. आता दिवाळीचा सण आला आहे. हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न आहे. शासन विविध याेजनांवर काेट्यवधी रूपये खर्च करते. त्या तुलनेत अन्नधान्याच्या याेजनेवर हाेणारा खर्च अत्यल्प आहे. गरिबांच्या पाेटाचा विचार करता रेशन दुकानातून साखर व डाळ देण्यास काहीच हरकत नाही.
- शिवराम सडमेक, नागरिक
दुकानदारांचे कमिशन थकले
मे महिन्यापासून रेशन दुकानदार शासनाच्या माेफत धान्याची विक्री करीत आहेत. यावर शासनाकडून त्यांना कमिशन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र अजूनपर्यंत कमिशन देण्यात आले नाही. मुख्यमंत्री याेजनेंतर्गत मे महिन्यात ग्राहकांच्या धान्याचे पैसे दुकानदारांनी भरले हाेते. हे पैेसे व कमिशनही देण्यात आले नाही. वेळाेवेळी मागणी करूनही कमिशन मिळाले नसल्याने दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.