नागरिकांनी घाबरून जाऊ नये

By admin | Published: November 10, 2016 02:18 AM2016-11-10T02:18:45+5:302016-11-10T02:18:45+5:30

भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.

Do not be scared by the citizens | नागरिकांनी घाबरून जाऊ नये

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

Next

नोटा रद्द झाल्याचा परिणाम : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली : भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. लवकरच नव्या नोटा चलनात येणार असून त्यासाठी नागरिकांनी बॅक आणि टपाल कार्यालयात नोटा जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला केलेल्या विशेष संबोधनातून या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. याचे पडसाद बुधवारी दिवसभरात सर्वच क्षेत्रात जाणवले. याबाबत महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना याबाबतचे निर्देश जारी केले. सर्व बॅकांच्या सर्व शाखांनी आपल्या शाखेसमोर नोटा प्रक्रियेबाबत माहिती लिखित स्वरुपात येत्या दोन दिवसात प्रदर्शित करावी आणि नागरिकांना नोटा बदलण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी बाळगावी असे निर्देश नायक यांनी या बैठकीत दिले.

Web Title: Do not be scared by the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.