अपप्रचारावर विश्वास ठेवू नका

By admin | Published: February 29, 2016 01:02 AM2016-02-29T01:02:11+5:302016-02-29T01:02:11+5:30

गडचिरोली शहरात १३ मार्च रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Do not believe in propaganda | अपप्रचारावर विश्वास ठेवू नका

अपप्रचारावर विश्वास ठेवू नका

Next

भंते यांचे आवाहन : धम्म परिषदेचा उद्देश प्रामाणिकच
गडचिरोली : गडचिरोली शहरात १३ मार्च रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेबद्दल काही नागरिक अपप्रचार करून विरोध करीत आहेत. त्यांच्याबद्दल मंगल कामना व्यक्त करीत अशा खोट्या प्रचारावर मात्र जनतेने विश्वास न ठेवता या धम्म परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन भंते यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
मानवी कल्याणाचा संदेश देणारा व दु:ख मुक्तीचा मार्ग सागणारा बौध्द धम्म आहे. हाच संदेश मानवापर्यंत जावा या उदात्त हेतुने बौध्द धम्म परिषद आयोजित केली आहे. पत्रिका छापण्यापूर्वी रोहिदास राऊत यांचेसोबत बोलणे झाले होते. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच पत्रिकेत त्यांचे नाव छापण्यात आले. मात्र त्यांनी आपल्याला विचारले नसल्याचे म्हटले आहे, याबद्दल कळण्यास मार्ग नाही, असे भंते यांनी म्हटले.
यावेळी मुनीश्वर बोरकर यांनी रोहिदास राऊत यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद पाहिजे होते. मात्र त्यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ व्यक्ती या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपद देण्यात आले नाही. परिणामी नाराज झालेल्या राऊत यांनी अनाठायी आरोप केले आहेत. राऊत यांनी धम्माच्या कामात राजकारण करू नये, अशी माहिती मुनीश्वर बोरकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला भदन्त राजरत्न, सुबोध, विनयबोधी, पूर्णसागर, नागसेन, अ‍ॅड. राम मेश्राम, मुनीश्वर बोरकर, गोपाल रायपुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Do not believe in propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.