छापील किमतीपेक्षा जादा दराने खताची खरेदी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:16+5:302021-03-10T04:36:16+5:30
१ मार्च २०२१ पासून रासायनिक खताच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ होणार असल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे ...
१ मार्च २०२१ पासून रासायनिक खताच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ होणार असल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे बरेचसे कृषी केंद्र मालक याचा फायदा घेऊन आपल्या जवळ असलेल्या रासायनिक खताचा जुना साठा वाढीव दराने शेतकऱ्यांना विकण्याची शक्यता आहे. परंतु कृषी केंद्र मालकांना त्यांच्या जवळ असलेला जुना साठा संपेपर्यंत तो जुन्याच दराने विक्री करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करताना बॅगवरील अधिकतम विक्री मूल्य (एमआरपी) तपासूनच खताची खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जादा दराने कुठेही खताची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांना कळवावे, असे आवाहन देसाईगंज तालुका कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.