जिल्ह्यातील पॅथाॅलाॅजी लॅब बंद करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:21+5:302021-06-16T04:48:21+5:30
तालुक्यातील अनेक पॅथाॅलाॅजी लॅब व्यावसायिकांकडे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसल्याने सर्व लॅब बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांसमाेर माेठे ...
तालुक्यातील अनेक पॅथाॅलाॅजी लॅब व्यावसायिकांकडे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसल्याने सर्व लॅब बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांसमाेर माेठे संकट उभे ठाकले आहे. लॅब व्यावसायिकांनी आ. डॉ देवराव होळी यांची भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. तेव्हा आ. होळी यांनी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून प्रश्न मांडले व रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र मिळेपर्यंत खासगी लॅब बंद करू नये. यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी व मंत्रालयात बाेलणार असे सांगितले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, लॅब चालक असोशिएशनचे पदाधिकारी सुधीर चावरे, विपुल सरदार, अरुण गव्हारे, मनमतो सरकार, हितेश मेश्राम उपस्थित होते.
===Photopath===
130621\5113img-20210613-wa0095.jpg
===Caption===
गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी पॅथॉलॉजी लॅब बंद करू नये फोटो