कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:26 PM2017-12-21T22:26:30+5:302017-12-21T22:26:44+5:30

Do not close schools in low school | कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

Next
ठळक मुद्देशिक्षक समितीची मागणी : जि.प उपाध्यक्षांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चटोपाध्याय आयोगाच्या शिफारसीनुसार वरिष्ठ वेतन श्रेणी प्रलंबित निवड श्रेणीची प्रकरणे मंजूर करावी, प्रशासकीय माहितीकरिता सोशल मीडियाच्या वापराऐवजी अधिकृतरित्या पत्र पाठवावे, विभागीय चौकशी प्रकरणातून निर्दोष ठरलेल्या शिक्षकांचा निलंबन कालावधी, कर्तव्य कालावधी गणण्यात यावा, स्वच्छतागृहांचा अंतिम हप्ता ४८ हजार ४०० रूपये प्रमाणे २९० शाळांना देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकास सर्व लाभ देण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोबत चर्चा केली. या समस्या सोडविण्याचे आश्वासन कंकडालवार यांनी दिले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, नरेंद्र कोत्तावार, रमेश रामटेके, माया दिवटे, राकेश सोनटक्के, मनोज रोकडे, राजेश बाळराजे, लक्ष्मण गद्देवार, इरशाद शेख, अविनाश पत्तीवार, गुणवंत हेडाऊ, रवींद्र वासेकर, सुरेश नाईक, सोमेश दुर्गे उपस्थित होते.

Web Title: Do not close schools in low school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.