नगरपंचायत नको, नगरपरिषदच द्या
By admin | Published: May 24, 2014 11:37 PM2014-05-24T23:37:43+5:302014-05-24T23:37:43+5:30
शासनाने चामोर्शी शहरास नगरपंचायतीचा दर्जा देऊन एक महिन्याच्या आत आक्षेप नोंदविण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले आहे. मात्र चामोर्शीला नगर पंचायतीचा दर्जा न
ा्रामपंचायत पदाधिकार्यांची मागणी; ग्रा. पं. ने केला ठरावही पारित चामोर्शी : शासनाने चामोर्शी शहरास नगरपंचायतीचा दर्जा देऊन एक महिन्याच्या आत आक्षेप नोंदविण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले आहे. मात्र चामोर्शीला नगर पंचायतीचा दर्जा न देता नगर परिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी केली. चामोर्शी शहराची लोकसंख्या सध्या २५ हजारापेक्षा अधिक आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी नगर परिषद होणे अत्यंत आवश्यक आहे. नगर पंचायत व ग्रामपंचायतीस विकासासाठी सारखाच निधी मिळतो. मात्र नगर परिषदेला केंद्र, राज्य व नगर विकास खात्याकडून भरमसाठ विकास निधी मिळवून घेता येतो. यातून शहराचा सर्वांगीन विकास करणे शक्य होते. यामुळे शासनाने चामोर्शी शहरास नगर परिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी पदाधिकार्यांनी यावेळी केली. शासनाने चामोर्शी शहरास नगर पंचायतीचा दर्जा देऊन ग्रा. पं. पदाधिकारी, सदस्य व गावकर्यांची दुधावरची तहान ताकावर भागवू नये, अशीही भावना पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केली. नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीचा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला असून या ठरावाची प्रत शासन व प्रशासनास पाठविण्यात आली असल्याचेही यावेळी पदाधिकार्यांनी सांगितले. नगर परिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी ग्रा. पं. पदाधिकारी ग्रामस्थांना घेऊन अविरत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचाही निर्धार पदाधिकार्यांनी यावेळी बोलून दाखविला. पत्रकार परिषदेला सरपंच मालन बोदलकर, उपसरपंच नागोबा पिपरे, ग्रा. पं. सदस्य राहुल नैताम, सुमेध तुरे, विजय शातलवार, मधुकर गेडाम, अविनाश चौधरी, सोपान नैताम, हिरामण भाकरे उपस्थित आदी होते. (शहर प्रतिनिधी)